पान 5 : हरमलात रास्ता रोको
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:13+5:302015-07-31T22:25:13+5:30
मांद्रे : आश्वे-मांद्रे, हरमल, केरी, मोरजी आदी भागातील पालकांनी इंग्लिश माध्यमातील शाळांना सरकारी अनुदानास मंजुरी देणारे विधायक चालू विधानसभा अधिवेशनात मांडण्यात यावे, या मागणीसाठी फोर्स संघटनेने चालवलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शुक्रवारी हरमल (((आगर)))) पुलादरम्यान दोन तास वाहतूक रोखून धरली.

पान 5 : हरमलात रास्ता रोको
म ंद्रे : आश्वे-मांद्रे, हरमल, केरी, मोरजी आदी भागातील पालकांनी इंग्लिश माध्यमातील शाळांना सरकारी अनुदानास मंजुरी देणारे विधायक चालू विधानसभा अधिवेशनात मांडण्यात यावे, या मागणीसाठी फोर्स संघटनेने चालवलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शुक्रवारी हरमल (((आगर)))) पुलादरम्यान दोन तास वाहतूक रोखून धरली. रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाल्याने कामानिमित्त हरमलला येणारे व येथून बाहेर जाणारे लोक बराच वेळ अडकून पडले. अनुदान मंजुरीस विलंब करीत असल्याच्या सरकारच्या कृतीचा या वेळी निषेध नोंदवण्यात आला. या वेळी हरमलचे पंच इनासियो डिसोझा, समाजकार्यकर्ते बॉस्को फर्नांडिस, लुईस रॉड्रिग्स, राफायल फर्नांडिस आदी उपस्थित होते. हरमल, आश्वे-मांद्रे, केरी, मोरजी आदी भागातील पालक मोठय़ा संख्येने यात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी कोणताच अनुचित प्रकार न करता शांतपणे आपल्या मागण्यांसाठी रास्ता रोको करून घोषणा दिल्या. या वेळी पेडणे पोलीस फाटा तैनात होता. (प्रतिनिधी) फोटो :3107-एमएपी-16 ते 18 हरमल येथे रास्ता रोकोत सहभागी झालेले पालक. (लक्ष्मण ओटवणेकर)