पान १...याकुबने बॉम्बस्फोटातील आरोपींना फोडला घाम
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:14+5:302015-07-31T22:25:14+5:30
(पान १..महत्त्वाची बातमी...राज्यासाठीही)

पान १...याकुबने बॉम्बस्फोटातील आरोपींना फोडला घाम
(प ान १..महत्त्वाची बातमी...राज्यासाठीही)............................................याकुबने बॉम्बस्फोटातील आरोपींना फोडला घामडोसा, सालेम, ताहिरचे चेहरे पडलेजयेश शिरसाट : मुंबईयाकूब मेमनला फाशी दिल्यानंतर १९९३ बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील अन्य सात आरोपींना चांगलाच घाम फोडला आहे. शुक्रवारी न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या या आरोपींच्या चेहेर्यावरून ही बाब स्पष्टपणे होत होती.टाडा न्यायालयाने १२३ आरोपींचे भवितव्य २००७ मध्ये ठरवले. यापैकी २३ आरोपींना निर्दोष मुक्त करून उर्वरित १०० आरोपींना दोषी ठरवले. याकुबसह एकूण ११ आरोपींना टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर अटक झालेल्या किंवा प्रत्यार्पण झालेल्या सात आरोपींविरुद्धचा खटला सध्या टाडा न्यायालयात सुरू आहे. नामचिन स्मगलर, दाऊदचा विश्वासू हस्तक मुस्तफा अहमद डोसा उर्फ मुस्तफा मज्नू, गँगस्टर अबू सालेम, रियाझ सिद्धिकी, अब्दुल कय्युम करिम शेख, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खान आणि ताहिर मोहम्मद मर्चंट उर्फ ताहिर टकल्या अशी या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी हे सातही आरोपी टाडा न्यायालयात हजर होते.मात्र आज त्यांचा न्यायालयातला वावर वकिलांसह उपस्थित कर्मचार्यांनाही विशेष जाणवला आणि खटकलाही. पोर्तुगालसोबतच्या करारानुसार सालेमला फाशी होऊ शकत नाही. असे असूनही सालेम तणावग्रस्त दिसत होता. प्रदीप जैन हत्याकांडात तीनवेळा जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही सालेमच्या चेहर्यावरचे भाव बदलले नव्हते. मात्र तोच सालेम याकुबच्या फाशीनंतर वकिलांशी चर्चामग्न झालेला दिसत होता. डोसाचेही तेच. आर्थररोड असो की तळोजा कारागृह जिथे ठेवतील तिथे समर्थक, चाहत्या कैद्यांची गर्दी खेचणारा, नेहमीच मस्तमौला आणि शाही थाटात वावरणारा डोसाही खचलेला दिसून आला. वकिलांसोबत गहन चर्चेत मग्न असलेला आणि आज दिवसभर चेहेरा पाडून बसलेला डोसा याकुबच्या फाशीनंतर हादरल्याचे जाणवत होते...................................आरोपींचे प्रोफाईल(डोसा, सालेम, ताहिर टकल्याचे फोटो मेलवर पाठवले आहेत.)..................................मुस्तफा डोसा- आरोपी क्रमांक १३८. २० मार्च २००३ रोजी डोसाला सीबीआयने अटक केली. नामचिन तस्कर असलेल्या डोसाचे डी कंपनीशी व डॉन दाऊदशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. बॉम्बस्फोटांसाठी सीमेपलीकडून रायगड किनार्यावर स्फोटके, शस्त्रास्त्रे पाठवण्यात व ती उतरवून घेण्यात डोसाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच बॉम्बस्फोटांचा कट आखण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये डोसा हजर होता. अबू सालेम- आरोपी क्रमांक १३९. डी कंपनीचा गँगस्टर सालेमचे२००५मध्ये पोर्तुगालहून प्रत्यार्पण करण्यात आले. २ ऑगस्टला सीबीआयने सालेमला या गुन्ह्यात अटक केली. जानेवारी १९९३मध्ये तो भरूच येथे गेला होता. तेथील किनार्यावर उतरलेली स्फोटके व शस्त्रे त्याने कारमधून मुंबईला आणली. अभिनेता संजय दत्तला एके-४७ आणि ग्रेनेड्स सालेमनेच दिली. सालेमलाही टायगर, दाऊदच्या कटाबाबत पूर्ण माहिती होती, असा आरोप सीबीआयने ठेवला आहे.रियाझ सिद्धिकी- आरोपी क्रमांक १४०. सालेमसोबतच रियाझलाही सीबीआयने गजाआड केले. बॉम्बस्फोटांच्या कटात सहभाग घेणे आणि गुजरातेतून स्फोटके व शस्त्रे मुंबईत आणण्यासाठी सालेमला सर्वतोपरी सहकार्य करणे, असा आरोप रियाझवर आहे.अब्दुल कय्युम शेख- आरोपी क्रमांक १४१. १३ फेब्रुवारी २००७मध्ये शेखला सीबीआयने या गुन्ह्यात अटक केली. अभिनेता संजय दत्तने दिलेल्या कबुली जबाबात शेखचा उल्लेख होता. त्याच्याविरोधातही गंभीर स्वरूपाचे आरोप सीबीआयने ठेवले आहेत.करिमुल्ला खान- आरोपी क्रमांक १४२. बॉम्बस्फोटांच्या कटात आणि तो अंमलात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका खानने बजावली. रायगडच्या शेखाडी किनार्यावर सीमेपलीकडून आलेली स्फोटके व शस्त्रे खानने उतरवून घेतली. पुढे हा साठा त्याने मुंब्रा व ठाण्यातील सेफ हाऊसमध्ये पोहोचवला.फिरोज खान- आरोपी क्रमांक १४३. १० फेब्रुवारी २०१०मध्ये गजाआड. स्फोटके व शस्त्रे दडवून ठेवल्याचा आरोप.ताहिर टकल्या- आरोपी क्रमांक १४४. ८ जून २०१० रोजी गजाआड. डॉन दाऊदचा अत्यंत विश्वासू साथीदार. बॉम्बस्फोटांसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण घेण्यासाठी आरोपींना व्हाया दुबईत पाकिस्तानात धाडणारा मुख्य आरोपी. ताहिरने दुबईत या आरोपींना आसरा दिला. बनावट पासपोर्ट तयार करून त्यांना पाकिस्तानात पाठवले, असा सीबीआयचा आरोप आहे.