पान १- एफ-एम-रेडिओ
By Admin | Updated: September 20, 2015 00:53 IST2015-09-20T00:53:47+5:302015-09-20T00:53:47+5:30
महाराष्ट्रातील एफ-एम-चॅनलमुळे केंद्रावर लक्ष्मी प्रसन्न

पान १- एफ-एम-रेडिओ
म ाराष्ट्रातील एफ-एम-चॅनलमुळे केंद्रावर लक्ष्मी प्रसन्न ६७५ कोटी मिळणार : सर्वाधिक बोली मुंबईसाठी, सर्वांत कमी बोली नांदेडसाठीनवी दिल्ली : (प्रमोद गवळी)खाजगी एफ-एम रेडिओ चॅनलच्या लिलावात महाराष्ट्रातील बोलींमुळे केंद्रावर लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. तिसर्या टप्प्यातील पहिल्या गटात यशस्वी बोली लागलेल्या महाराष्ट्रातील २३ चॅनलद्वारे सरकारला जवळपास ६७५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. हा एकूण महसुलाच्या (११५७ कोटी) ५८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे; मात्र राज्यातील ६ चॅनलची विक्री होऊ शकली नाही.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २७ जुलै रोजी ६९ शहरांमधील १३५ एफएम रेडिओ चॅनलचा लिलाव सुरू केला होता. त्यात ५६ शहरांतील ९७ चॅनलसाठी बोली लावण्यात आली. १३ शहरांतील चॅनलसाठी एकाही कंपनीने बोली लावली नाही. या १३ शहरांत महाराष्ट्रातील एकही शहर नाही.सर्वांत जास्त बोली २४५ कोटी ६२ लाख रुपये मुंबईतील २ चॅनलसाठी लावण्यात आली. सर्वांत कमी बोली नांदेडमधील एका चॅनलसाठी (२९ लाख ५९ हजार )अशी लावण्यात आली. कंपन्यांनी ९७ चॅनलसाठी एकूण ११५६.९ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. खरे तर या चॅनलचे आरक्षित मूल्य ४५९.८ कोटी रुपये होते. याचा अर्थ सरकारला ६९७.०५ कोटी रुपये जास्त मिळतील. टक्के वारीचा विचार करता हे प्रमाण १५१.५८ टक्के जास्त आहे.पहिल्या गटाचे एकूण आरक्षित मूल्य ५८०.१८ कोटी रुपये होते. सरकारला त्यातून ६०६.७२ कोटी रुपये जास्त मिळतील. या चॅनलसाठी गेल्या २ मार्च रोजी ई-लिलावासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ----------------एफ-एम-रेडिओ --जोड बॉक्सशहर मुंबई पुणेनागपूरअहमदनगरअकोलाऔरंगाबादधुळेजळगावकोल्हापूरनांदेडनाशिकसांगलीसोलापूर एकूणबोली (रुपयात)245, 62,62,69884,07,0053615,52,66,82294,26,62459,18,00012,46,78,98646,59,00073,18,00018,88,48,97829,59,0002,93,24,85,54046,59,0001,44,07,6226,74,75,90,806चॅनल संख्या- 02-02-02-02-02-02-01-02-02-01-02-01-0223