पान १- बॉक्स
By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:28+5:302015-07-16T15:56:28+5:30
मडगाव शहरातील कचर्याची उचल थांबल्याने रोगराई पसरू शकते, अशी भीती सध्या व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचार्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन संचालक एल्वीस गोमीस हे बुधवारी मडगावात आले. त्यांनी कामगार नेत्यांशी चर्चा केली. पालिका कर्मचार्यांना यापुढे सगळी सुरक्षा दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात अखिल गोवा नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर प्रभू यांना विचारले असता, आम्ही तोडग्यासाठी तयार आहोत; पण अजूनही आमचे समाधान होईल, असा तोडगा पुढे आलेला नाही. ज्या एनजीओने पालिका कर्मचार्याची अडवणूक केली त्याच्यावर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन आम्हाला पोलिसांकडून मिळाले, असे ते म्हणाले. तरीही आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मडगावचे

पान १- बॉक्स
म गाव शहरातील कचर्याची उचल थांबल्याने रोगराई पसरू शकते, अशी भीती सध्या व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचार्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन संचालक एल्वीस गोमीस हे बुधवारी मडगावात आले. त्यांनी कामगार नेत्यांशी चर्चा केली. पालिका कर्मचार्यांना यापुढे सगळी सुरक्षा दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात अखिल गोवा नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर प्रभू यांना विचारले असता, आम्ही तोडग्यासाठी तयार आहोत; पण अजूनही आमचे समाधान होईल, असा तोडगा पुढे आलेला नाही. ज्या एनजीओने पालिका कर्मचार्याची अडवणूक केली त्याच्यावर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन आम्हाला पोलिसांकडून मिळाले, असे ते म्हणाले. तरीही आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी संपावर तोडगा काढणे आवश्यक आहे. अन्यथा मडगावमध्ये कचर्याचा प्रश्न गंभीर बनेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.