शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

Pampore Encounter Update: पंपोरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; LeT च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 16:48 IST

Pampore Encounter : जम्मू- काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले,  नागरिकांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी 9 चकमकींमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगर : जम्मू -काश्मीरमध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सामील असलेला LeT चा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Terrorists) उमर मुश्ताक खांडे ( Umar Mustaq Khandey) आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. पुलवामाच्या (Pulwama) पंपोरमध्ये (Pampore) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी उमर  मुश्ताक खांडे याच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. (Pampore Encounter Update Big Action Of Security Forces In Pampore Lashkars Most Wanted Terrorist Umar Mustaq Khandey Killed)

जम्मू- काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले,  नागरिकांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी 9 चकमकींमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलांनी श्रीनगर शहरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच दहशतवाद्यांकडून आपत्तिजनक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. 

या परिसरात अद्याप दहशतवादी असल्याची शक्यता असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू ठेवली आहे. पोलिसांनी सांगितले की, ठार झालेला दहशतवादी उमर मुश्ताक खांडे याने श्रीनगरमधील बाघाट येथे मोहम्मद युसूफ आणि सीटी सुहेल या दोन पोलिसांची हत्या केली होती. पंपोरमधील दग्रबल येथे चहा पित असताना मोहम्मद युसूफ आणि सीटी सुहेल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंपोरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दल तेथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलानेही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्त्युतर दिले. दरम्यान, खात्मा करण्यात आलेले अन्य दोन दहशतवादी इतर अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. 

दरम्यान, यापूर्वी काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी ट्वीट करून माहिती दिली होती की, टॉप 10 दहशतवादी उमर मुश्ताक पंपोर चकमकीत अडकले आहेत. तसेच, ते म्हणाले होते की, मुश्ताकचा ऑगस्टमध्ये सलीम पर्रे, अब्बास शेख, फारुख नली, युसुफ कांत्रो, रियाज शेटेरगुंड, जुबैर वानी, साकीब मंजूर आणि अशरफ मोल्वी आणि वकील शाह यांच्यासह टॉप 10 दहशतवाद्यांच्या टारगेट लिस्टमध्ये सामील केले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी