शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोरोनाबाधित पत्नीला वाचवण्यासाठी पतीने खर्च केले 1.25 कोटी; अशी जिंकली मृत्यूशी लढाई... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:57 IST

Doctor saved Covid-19 infected wife’s life in Pali : कोरोनामुळे आजारी पडलेल्या पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टर सुरेश चौधरी  (Dr. Suresh Choudhary) यांनी आपली पदवी गहाण ठेवली. उपचारांसाठी जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च केले.

पाली : राजस्थानमधील (Rajasthan)एका व्यक्तीने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या पत्नीला जीवनाची भेट दिली. पाली येथील डॉक्टर सुरेश चौधरी यांनी पत्नीला वाचवण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आपल्या पत्नीला मृत्यूच्या कचाट्यातून बाहेर आणले. सर्वस्व पणाला लावून त्यांनी आपल्या पत्नीचे प्राण वाचवले. कोरोनामुळे आजारी पडलेल्या पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टर सुरेश चौधरी  (Dr. Suresh Choudhary) यांनी आपली पदवी गहाण ठेवली. उपचारांसाठी जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च केले.

दरम्यान, आज सर्वत्र या जोडप्याची जोरदार चर्चा होत आहे. सुरेश चौधरी हे पाली जिल्ह्यातील खैरवा गावचे रहिवासी आहेत. ते पत्नी अनिता आणि 5 वर्षांच्या मुलासोबत राहतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांच्या पत्नीची प्रकृती खालावली होती. त्यांना खूप ताप आला. टेस्ट केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती ढासळू लागली. अशा परिस्थितीत सुरेश यांनी आपल्या पत्नीसह बांगर हॉस्पिटल गाठले, मात्र तेथे त्यांना बेड मिळाला नाही. पत्नीची प्रकृती सतत खालावत चालली होती. त्यानंतर सुरेश हे पत्नीसह जोधपूर एम्समध्ये पोहोचले. याठिकाणी पत्नीला उपचारांसाठी दाखल केले.

पत्नीला वाचवण्यासाठी हार मानली नाहीसुरेश हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ज्या वेळी त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडली, त्यावेळी कोरोनाचा कहर झाला होता. त्यांना सुट्या मिळत नव्हत्या. त्यानंतर ते आपल्या एका नातेवाईकाकडे पत्नीला सोडून पुन्हा ड्युटीवर गेले. दरम्यान, पत्नी अनिता यांची प्रकृती खूपच बिघडली आहे. त्यांचे फुफ्फुस 95 टक्के खराब झाले असून त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच, अनिता यांना वाचविणे खूप कठीण आहे, असे डॉक्टरांनी सांगितले होते. अशा परिस्थितीत सुद्धा सुरेश यांनी हार मानली नाही. त्यानंतर ते पत्नीसह अहमदाबादला गेले. 1 जून रोजी सुरेश यांनी अनिता यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

उपचारांसाठी दिवसाचा खर्च लाखों रुपयेअनिता यांचे कारण कोरोनामुळे वजन बरेच कमी झाले होते. त्यांच्या शरीरातही रक्ताची कमतरता होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांना ईसीएमओ मशीनवर हलवले. या मशिनद्वारे त्यांचे हृदय आणि फुफ्फुसावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. एका दिवसात या मशिनची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असल्याचे सुरेश यांनी सांगितले. उपचारामुळे सुरेश यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला. पण कोणत्याही परिस्थितीत पत्नीला वाचवायचे आहे, असा विचार त्यांनी केला होता. अनिता या तब्बल 87 दिवस रुग्णालयात होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारू लागली आणि त्यांचे प्राण वाचले.

एमबीबीएसची पदवी गहाण ठेवलीदरम्यान, अनिता यांच्या उपचारासाठी पैसे उभे करायचे होते, म्हणून एमबीबीएसची पदवी गहाण ठेवून बँकेकडून 70 लाखांचे कर्ज घेतल्याचे सुरेश  सांगतात. तसेच, स्वतःची बचत फक्त 10 लाख रुपये होती. याशिवाय, मित्र आणि सहकारी डॉक्टरांकडून 20 लाख रुपये घेतले. त्याचवेळी त्यांनी त्यांचा एक प्लॉट 15 लाख रुपयांना विकला. इतर नातेवाईकांकडूनही पैसे घेतल्याचे सुरेश यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान