शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

टाळी एका हाताने वाजत नाही, न्यायालयाने वकील, पोलिसांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 07:46 IST

सर्वोच्च न्यायालय; वकील, पोलिसांना फटकारले

नवी दिल्ली : तीस हजारी न्यायालयाच्या संकुलात २ नोव्हेंबर रोजी झालेल्या धुमश्चक्रीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पोलीस व वकील या दोघांना जबाबदार धरले आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.ओडिशामधील वकिलांनी केलेल्या संपाबद्दलच्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने तीस हजारी न्यायालयाच्या संकुलातील हाणामारीबाबत मत व्यक्त केले. वकील, पोलीस वादाबद्दल विशिष्ट पद्धतीने निर्णय घेतला असे कोणी म्हणायला नको म्हणून या प्रकरणाबाबत आम्ही लगेचच मतप्रदर्शन केले नव्हते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पोलीस व वकील यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीच्या निषेधार्थ वकिलांनी सलग पाचव्या दिवशी, शुक्रवारी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार कायम ठेवला होता. आपले चेंबर सील करण्याच्या व वकिली सनद रद्द करण्याच्या दूरध्वनीवरून धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप एन. एल. राव या वकिलाने केला आहे. पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर राव यांनी वकिली सुरू केली होती. एन. एल. राव हे पोलीस अधिकारी आहेत की वकील हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी करणारी पोस्टर त्यांच्या चेंबरच्या मुख्य प्रवेशद्वारावर अज्ञात व्यक्तींनी चिटकवली आहेत. कामकाजावर वकिलांनी टाकलेला बहिष्कार सुरूच आहे, असे बार असोसिएशन आॅफ डिस्ट्रिक्ट कोर्टस् या संघटनेने म्हटले आहे. याआधी बुधवारी वकिलांनी न्यायालयाचे दरवाजे बंद करून पक्षकार, पोलिसांना प्रवेश नाकारला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वकिलांनी पक्षकारांना न्यायालयात जाण्यास मज्जाव केला नाही. मारहाणीची चौकशी करणाºया दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसोबत वकिलांची बैठक अद्याप झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मारहाणीच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून निदर्शने करणाºया तसेच धरणे धरणाºया पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची विनंती करणाºया याचिकेवर येत्या फेब्रुवारी महिन्यात सुनावणी घेण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने ठरविले आहे.मारहाणीची चौकशी करण्याची मागणीतीस हजारी न्यायालय संकुलात एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाºयाला दंगेखोरांनी मारहाण केल्याच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना एका पत्राद्वारे केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ उपलब्ध आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसdelhiदिल्ली