पाकला धक्का, संयुक्त राष्ट्राचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार
By Admin | Updated: October 14, 2014 15:11 IST2014-10-14T15:03:22+5:302014-10-14T15:11:43+5:30
काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची मागणी संयुक्त राष्ट्राने फेटाळून लावल्याने पाकला चपराक बसली आहे.

पाकला धक्का, संयुक्त राष्ट्राचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १४ - काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची मागणी संयुक्त राष्ट्राने फेटाळून लावली आहे. भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले आहे.
सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून काश्मीर प्रश्न पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रासमोर नेण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रामधील भाषणात काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर शरीफ यांच्या परराष्ट्र आणि सुरक्षाविषयक सल्लागारांनी शनिवारी संयुक्त राष्ट्राला पत्र पाठवून काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या पत्रात भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असा कांगावाही पाकिस्तानने केला होता.
संयुक्त राष्ट्राने मंगळवारी पाकिस्तानच्या पत्राचे उत्तर दिले आहे. या पत्रात संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न रेटण्याची पाकची चाल अयशस्वी ठरल्याचे दिसते.