वानीच्या उदात्तीकरणाबद्दल भारताकडून पाकचा निषेध
By Admin | Updated: July 10, 2017 00:29 IST2017-07-10T00:29:12+5:302017-07-10T00:29:12+5:30
अतिरेकी बुऱ्हान वानी याचे उदात्तीकरण केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला रविवारी जोरदार फटकारले

वानीच्या उदात्तीकरणाबद्दल भारताकडून पाकचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अतिरेकी बुऱ्हान वानी याचे उदात्तीकरण केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला रविवारी जोरदार फटकारले व दहशतवादाला पाकिस्तानचा मिळत असलेला पाठिंबा आणि त्याच्याकडून होत असलेले प्रायोजकत्व याचा सगळ््यांनी निषेध केला पाहिजे, असे म्हटले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी टिष्ट्वटरवर कडक शब्दांत पाकिस्तानचा निषेध केला. बागले म्हणाले,‘‘पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बुऱ्हान वानीचे उदात्तीकरण करीत असून दहशतवादाला पाक देत असलेला पाठिंबा आणि त्याचे करीत असलेल्या प्रायोजकत्वाचा सगळ््यांनी निषेध केला पाहिजे.’’