दहशतवाद्यांना पाकचीच रसद
By Admin | Updated: December 7, 2014 02:36 IST2014-12-07T02:36:16+5:302014-12-07T02:36:16+5:30
दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या सहा संशयित अतिरेक्यांना पाकिस्तानी सैन्याकडून रसद पुरवली जात असल्याचे पुरावे हाती आले आहेत़

दहशतवाद्यांना पाकचीच रसद
सर्व स्तरांतून निषेध : घुसखोरांजवळ पाकिस्तानी सैन्याची अन्नाची पाकिटे
श्रीनगर : उरी भागात लष्कराच्या एका छावणीवर दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या सहा संशयित अतिरेक्यांना पाकिस्तानी सैन्याकडून रसद पुरवली जात असल्याचे पुरावे हाती आले आहेत़ दहशतवाद्यांकडे पाकिस्तानातील अन्नाची पाकिटे सापडली आहेत़ एका वरिष्ठ लष्करी अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, पाक सैन्य अशा अन्नाच्या पाकिटाचा वापर करत़े
दरम्यान, काश्मीर खो:यात शुक्रवारी केलेला दहशतवादी हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची निंदा केली आह़े तर केंद्रात भाजपाचे सरकार येताच जम्मू-काश्मिरात अतिरेकी हल्ल्यांनी तोंड काढले असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला़
शुक्रवारी उरी सेक्टरमधील लष्करी छावण्यांवर अतिरेक्यांनी 12 तासांत चार भीषण हल्ले केले होत़े या हल्ल्यांत भारताचे 11 जवान शहीद झाले होत़े शनिवारी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग श्रीनगरमध्ये पोहोचले आणि त्यांनी सुरक्षास्थितीचा आढावा घेतला़ शिवाय हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली़ देशाच्या सुरक्षेसाठी प्राणाचे बलिदान देणा:या शहिदांना मी सलाम करतो़, असे लष्करप्रमुख म्हणाल़े
निवडणूक प्रचार सुरूच
जम्मू-काश्मिरातील निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्याच्या प्रयत्नांतर्गत दहशतवाद्यांनी हल्ले केले असले, तरी राजकीय पक्षांनी या दहशतीला न घाबरता आपला निवडणूक प्रचार चालू ठेवला आह़े शनिवारी विविध राजकीय पक्षांच्या सुमारे डझनभर रॅली व रोड शो झाल़े (वृत्तसंस्था)
मोदींचे सरकार येताच दहशतवादी हल्ले सुरू
आम्ही केंद्रात 1क् वर्षे सत्तेवर होतो़ या काळात जम्मू-काश्मिरात शांतता नांदत होती़ राज्यातील पर्यटकांची संख्या वाढली होती़ पण केंद्रात मोदींचे सरकार येताच दहशतवादी कारवायांनी तोंड वर काढले आह़े निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी जेथे कुठे जातात तिथे हिंसाचार होतो, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला़ झारखंडच्या रामगड येथे एका निवडणूक रॅलीत ते बोलत होत़े
हा लोकशाहीवर हल्ला
दहशतवाद्यांनी भारताच्या लोकशाहीवर हल्ला चढवला़ पण देशाच्या शूर जवानांनी आपले बलिदान देऊन देशाची सुरक्षा केली. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मोदींची रॅली होणारच
काश्मीर खो:यामध्ये अतिरेक्यांनी चार हल्ले केल्यामुळे दहशतीचे वातावरण असले तरी नरेंद्र मोदी यांची श्रीनगर येथे 8 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक रॅली पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसेन यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने पाक पुरस्कृत अतिरेकी गट खवळले आहेत़ निवडणुका उधळून टाकण्याचे त्यांचे मनसुबे आहेत़ पण लष्कर अतिरेक्यांचे हे मनसुबे कधीही फत्ते होऊ देणार नाही.
- लष्करप्रमुख
दहशतवाद्यांकडून सहा एके 56 रायफल्स, 55 काडतुसे, दोन शॉटगन, दोन दुर्बिणी, 4 रेडिओ सेट्स, 32 ग्रेनेड्स आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले आह़े