पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

By Admin | Updated: September 29, 2016 10:01 IST2016-09-29T10:01:22+5:302016-09-29T10:01:22+5:30

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असताना पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

Pakistan's Kurashati launched, once again the violation of arms | पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. 29 - उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असताना पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्यांनी बुधवारी पूंछ जिल्ह्यातील भारतीय लष्करच्या ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात कोणीही जखमी किंवा जिवीतहानी झालेली नाही. 
 
पाकिस्तानी लष्कराच्या सैन्यांनी पूंछ जिल्ह्यातील सेब्जिअन परिसरात छोट्या शस्त्रांच्या सहाय्याने फायरिंग केल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतरच दोन दिवसांनी पाकिस्तानने याच परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. 
 

Web Title: Pakistan's Kurashati launched, once again the violation of arms