काश्मिरमध्ये पाकचे झेंडे फडकावणारच - गिलानी
By Admin | Updated: June 1, 2015 15:14 IST2015-06-01T12:11:43+5:302015-06-01T15:14:01+5:30
पाकिस्तान आमचा शेजारी देश असून यापुढेही काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावतच राहणार असे वक्तव्य हुर्रियत कॉन्फरन्सचे नेता सईद अली शहा गिलानी यांनी केले आहे.

काश्मिरमध्ये पाकचे झेंडे फडकावणारच - गिलानी
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १ - पाकिस्तान आमचा शेजारी देश असून यापुढेही काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावतच राहणार असे वक्तव्य हुर्रियत कॉन्फरन्सचे नेता सईद अली शहा गिलानी यांनी केले आहे. काश्मीरमध्ये जेव्हा जेव्हा हुर्रियत कॉन्फरन्सच्या रॅली होतील, तेव्हा तेव्हा पाकिस्तानचा झेंडा फडकवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवला जाण्याच्या सततच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र असे असतानाही रविवारी गिलानी यांनी हे वक्तव्य केले. ' काश्मीरला स्वनिर्णयाचे स्वातंत्र्य देण्याच्या कल्पनेला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. येथील नागरिकांचे पाकिस्तानवर प्रेम आहे. १९४७ सालापासून काश्मीरमध्ये पाकचे झेंडे फडकत आले आहेत आणि यापुढेही फडकत राहतील' असे ते म्हणाले.