शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:34 IST

Jammu Kashmir Assembly Election 2024: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. या वादात आता पाकिस्ताननेही उडी घेत धक्कादायक दावा केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. या वादात आता पाकिस्ताननेही उडी घेत धक्कादायक दावा केला आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडी ही एकमेकांसोबत आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानंतर भाजपानेकाँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स यांच्या आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसिफ यांनी जियो न्यूजचे पत्रकार हामिद मीर यांच्याशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस आघाडी हे एकत्र आहेत.  दरम्यान, पाकिस्तानच्या या दाव्यावर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, काँग्रेसने जम्मू काश्मीरच्या आपल्या जाहीरनाम्यामधून कलम ३७० बाबत कुठलंही विधान केलेलं नाही, तसेत आश्वासनही दिलेलं नाही. मात्र जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन मात्र काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. 

तर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या दाव्यानंतर भाजपाकडून आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानसारखा एक दहशतवादी देश काश्मीरच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सच्या भूमिकेला पाठिंबा देतो, अशी टीका अमित मालविय यांननी केली. जो पाकिस्तानचा मुद्दा आहे तोच काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचा मुद्दा आहे, हे आता स्पष्ट झाले आहे, असे भाजपा नेते शहजाद पूनावाला म्हणाले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तानBJPभाजपा