शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र, भारताकडून इम्रान खान यांच्या दाव्याची पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 20:59 IST

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.

ठळक मुद्देपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होतापाकिस्तान हा दहशकवादाचे केंद्र असून, पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आश्चर्य वाटले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे

नवी दिल्ली - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या दाव्याची भारताने पोलखोल केली आहे. पाकिस्तान हा दहशकवादाचे केंद्र असून, पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आश्चर्य वाटले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ''पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आम्हाला आश्चर्य वाटलेले नाही. एवढ्या भीषण हल्ल्याचा साधा निषेधही त्यांनी नोंदवला नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जैश ए मोहम्मदसारख्या दहशतावादी संघटनेने केलेल्या दाव्याकडेही दुर्लक्ष केले आहे. मात्र जैश ए मोहम्मद ही संघटना आणि त्यांचा म्होरक्या मसूद अझहर हे पाकिस्तानात वास्तव्यास आहेत,'' असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.  ''पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताने पुरावे दिल्यास तपास करू असा प्रस्ताव पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिला आहे. मात्र पाकिस्तानकडून देण्यात येणारे आणि घासून गुळगुळीत झालेले हे वक्तव्य आहे. मुंबई हल्ल्यावेळी पण पाकिस्तानला पुरावे देण्यात आले होते. मात्र गेल्या 10 वर्षांत त्यासंबंधीच्या प्रकरणात काहीही प्रगती झालेली नाही.'' असा टोला परराष्ट्र मंत्रालयाने लगावला आहे. दरम्यान, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर गप्प बसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर या प्रकरणावरील आपले मौन सोडले. मात्र पुलवामा हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास राजकीय लाभ मिळू शकतो. मात्र पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतImran Khanइम्रान खान