दगाबाजी करून पाकिस्तानने केला भारतीय जवानांवर हल्ला

By Admin | Updated: May 2, 2017 07:02 IST2017-05-02T07:02:09+5:302017-05-02T07:02:09+5:30

नियंत्रण रेषेवर गस्त घातल असलेल्या भारताच्या दोन जवानांची पाकिस्तानी सैन्याने हत्या करून त्याच्या मृतदेहाची

Pakistans attack Indian soldiers | दगाबाजी करून पाकिस्तानने केला भारतीय जवानांवर हल्ला

दगाबाजी करून पाकिस्तानने केला भारतीय जवानांवर हल्ला

ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर. दि. 2 - नियंत्रण रेषेवर गस्त घातल असलेल्या भारताच्या दोन जवानांची पाकिस्तानी सैन्याने  हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याची घटना काल घडल्यापासून देशात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान,   पाकिस्तानने सापळा रचून दगाबाजीने या जवानांची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. 
 
काल नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटी परिसरात ही घटना घडली होती. लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाचे एक संयुक्त गस्तीपथक या परिसरात गस्त घालण्यासाठी गेले असता तेथे दबा धरून बसलेल्या बसलेल्या पाकिस्तानी जवानांनी त्यांची हत्या केली. 
 
पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीत घुसून भूरसुरुंग पेरल्याची खबर  गुप्तचर विभागाने दिली होती. त्यानंतर  त्याची तपासणी करण्यासाठी जवान तेथे गेले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या बॅटच्या जवानांनी या जवानांची हत्या करून त्यांचे मृतदेहांची विटंबना केली होती. दरम्यान, या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी लष्कराल मोकळीक देण्यात आली आहे.  

Web Title: Pakistans attack Indian soldiers