शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे नापाक कारस्थान उधळले! भारतीय अधिकाऱ्यांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा होता डाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 08:11 IST

सातत्याने भारताला पाण्यात पाहणाऱ्या आणि भारतविरोधी कारवाया करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अजून एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडले आहे.

नवी दिल्ली - सातत्याने भारताला पाण्यात पाहणाऱ्या आणि भारतविरोधी कारवाया करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अजून एक नापाक कृत्य भारताने हाणून पाडले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आयएसआयने हनिट्रॅप लावला होता. भारतीय अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणामुळे हा डाव उधळून लावण्यात यश मिळाले आहे. यासंदर्भात तीन भारतीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्यांनी आयएसआयच्या या डावाबाबत आपल्या विभागाला माहिती दिली होती. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आयएसआयने हा डाव आखला होता. मात्र या अधिकाऱ्यांनी या डावाला बळी पडत कोणतेही चुकीचे कृत्य केल्याचे समोर आलेले नाही. तिन्ही भारतीय अधिकाऱी चौकशीला सहकार्य करत असून, आतापर्यंत कोणत्याही दृष्टीकोनातून या अधिकाऱ्यांना संशयित मानण्यात आलेले नाही. भारतासंदर्भातील काही गोपनीय दस्तऐवज हस्तगत करण्यासाठी पाकिस्तान अशी चाल खेळू शकतो, असा संशय आधीपासूनच असल्याने हा डाव उधळून लावता आला. सध्यातरी या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुरू असून, या अधिकाऱ्यांना पुन्हा पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार नाही, अशी शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, "हे भारतीय अधिकारी पाकिस्तानमधील भाषा विभागात कार्यरत होते. भारतातून आलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे भाषांतर करण्याचे काम हे अधिकारी करत असत. या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक वेळा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. कनिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तानमधील कुठल्यातरी गोपनीय ठिकाणी नेऊन त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवण्याचा डाव होता. या व्हिडिओंचा वापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात आयएसआय होती." शत्रूराष्ट्रासंदर्भात गोपनीय माहिती हस्तगत गण्यासाठी अशा प्रकारचे सापळे जगभरात लावले जातात. मात्र, पाकिस्तानकडून भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आखण्यात आलेली योजना काहीशी धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या या कटकारस्थानाबाबत भारताच्या अधिकाऱ्यांना आधीच सुगावा लागलेला असल्याने त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर भारत सरकराने या अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे.  आता या प्रकरणावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय सरकारकडून पुढच्या काही दिवसांत घेण्यात येईल.  तसेच या अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानकडून महिलांचा वापर झाला का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान