पाकच्या ७ रेंजर्ससह एका दहशतवादयाचा खात्मा
By Admin | Updated: October 21, 2016 21:08 IST2016-10-21T21:08:57+5:302016-10-21T21:08:57+5:30
सीमेपलीकडून गोळीबार होताच बीएसएफ जवानांनी जागा घेत पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये भारतीय जवांनी पाक रेंजर्सचे ७ जवानासह एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.
_ns.jpg)
पाकच्या ७ रेंजर्ससह एका दहशतवादयाचा खात्मा
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २१ : पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी निमलष्करी दलाने कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांनाही लक्ष्य केले. छोट्या शस्त्रांद्वारे मारा करण्यात आला. सीमेपलीकडून गोळीबार होताच बीएसएफ जवानांनी जागा घेत पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये भारतीय जवांनी पाक रेंजर्सचे ७ जवानासह एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. पाकच्या आगळिकीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गुरुवारी याच भागात ६ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता.
पाकिस्तानी सैन्याने रात्री राजौरी जिल्ह्यात ताबा रेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली. सीमेपलीकडून होत असलेल्या माऱ्याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असून चकमक सुरू आहे, असेही हा प्रवक्ता म्हणाला. पाकिस्तानी निमलष्करी दलाने कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांनाही लक्ष्य केले. छोट्या शस्त्रांद्वारे मारा करण्यात आला. सीमेपलीकडून गोळीबार होताच बीएसएफ जवानांनी जागा घेत पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर उभय पक्षांत १५ मिनिटे चकमक झडली. यात बीएसएफचा एक जवान जखमी झाला.
या भागात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात गेल्या ४ दिवसांपासून चकमकी झडत आहेत. पाकने गेल्या ४ दिवसांत ५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गुरुवारी सीमेपलीकडून भीमबर गली भागात तोफगोळ्यांचा मोठ्या प्रमाणात मारा झाला होता.