पाकिस्तानी लेखकाने सैफ-करीनाला फटकारले

By Admin | Updated: December 22, 2016 15:26 IST2016-12-22T12:07:31+5:302016-12-22T15:26:57+5:30

सैफ अली खानने आपल्या घरी आलेल्या छोटे नवाबचे नामकरण तैमूर अली खान पतौडी केल्यापासून या जोडीला अत्यंत खालच्या पातळीची टीका सहन करावी लागत आहे.

Pakistani writer blames Saif and Kareena | पाकिस्तानी लेखकाने सैफ-करीनाला फटकारले

पाकिस्तानी लेखकाने सैफ-करीनाला फटकारले

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 22 - करीना कपूर आणि सैफ अली खानने आपल्या घरी आलेल्या छोटे नवाबचे नामकरण तैमूर अली खान पतौडी केल्यापासून या जोडीला अत्यंत खालच्या पातळीची टीका सहन करावी लागत आहे. सोशल मीडियावर जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. तैमूर नावाचे समर्थक आणि विरोधक परस्परांवर तुटून पडले आहेत. 
 
मुलाचे नाव ठरवण्याचा अधिकार आई-वडिलांचा असल्याने काही सेलिब्रेटींनी सैफीनाचे समर्थन केले आहे. सैफीनाने आपल्या मुलाला 13 व्या शतकात भारतावर स्वारी करणारा क्रूर शासक तैमूरचे नाव का दिले ? असा प्रश्न काहींनी विचारला आहे. 
 
आता एका पाकिस्तानी वंशाच्या लेखकाने तैमूर नावावर सैफ-करीनाला झापले आहे. सैफ- करीना तुम्ही एकतर निरशर आहात किंवा उद्धट. तैमूर नावाने तुम्ही तुमच्या मुलाची तुलना भारतात नरसंहार करणा-याशी होईल अशी व्यवस्था केली आहे असे टि्वट पाकिस्तानी वंशाचे कॅनडीयन लेखत तारेक फतेह यांनी म्हटले आहे.  
 

Web Title: Pakistani writer blames Saif and Kareena