शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 08:01 IST

जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगाजी हैदर उर्फ ​​सैफुल्ला मीरला हिज्बुल मुजाहिद्दीनने काश्मीरचा प्रमुख बनवलाआज काश्मीरमध्ये कार बॉम्ब अथवा आत्मघाती हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनंतर काश्मीर खोऱ्यात रेड अलर्ट

नवी दिल्ली - पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याची योजना आखत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर सुरक्षा दलाला रेड अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. दहशतवादी कार बॉम्ब किंवा आत्मघाती बॉम्बद्वारे हल्ला करण्याची शक्यता असल्याचा संशय सुरक्षा दलाला आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनने रियाज नायकू चकमकीत ठार झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील संघटनेचा प्रमुख म्हणून गाजी हैदर उर्फ ​​सैफुल्ला मीर याची नियुक्ती केली आहे. एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की गाजी हैदर हे त्याचे खोटे नाव आहे, गाजी म्हणजे इस्लामिक योद्धा आणि हैदर म्हणजे शूर. नव्या हिजबुल प्रमुखचा शोध लवकरच सुरू केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. दहशतवादी संघटनेने दुसरी फळीही तयार केली आहे. गाजी हैदरचा उपप्रमुख जफर उल इस्लाम असेल आणि अबू तारिकला मुख्य सैन्य सल्लागारची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुरक्षा दलाची पहिली प्राथमिकता म्हणजे ११ मे रोजी जैश-ए-मोहम्मदचा संभाव्य हल्ला रोखणे ही आहे. अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटना या हल्ल्याची तयारी करत आहे.. गुप्तचर अहवालानुसार गेल्या आठवड्यात जैशचा प्रमुख मुफ्ती अब्दुल रऊफ असगरने आयएसआयच्या प्रमुखाची भेट घेतली.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११ मे हीच तारीख का निवडली त्यामागे कारण आहे. आज रमजानचा १७ वा दिवस आहे. याच दिवशी सौदी अरेबियामध्ये बद्रची लढाई सुरू झाली, जी काही शंभर सैनिकांनी जिंकली. इस्लामी इतिहासामधील हा एक मोठा विजय म्हणून पाहिला जातो तसेच हे एक महत्त्वपूर्ण वळण मानले जाते. याव्यतिरिक्त, पोखरणमधील अणू चाचणीच्या परीक्षणाचा २२ वा वर्धापन दिन आहे. ११ मे १९८८ रोजी भारत अणुऊर्जा संपन्न देश बनला होता.

जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. काश्मीर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या या दहशतवादी गटासाठी हे कमी खर्चिक आहे. तसेच हा हल्ला स्थानिक काश्मिरींनी केला असा दावा करणेही पाकिस्तानला सोयीस्कर जातं.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद