शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरवर बोलता बोलता इम्रान खान यांच्याकडून दहशतवादी डारचं समर्थन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 21:23 IST

पुलवामात 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्याचा खान यांना पुळका

इस्लामाबाद: भारताच्या कठोर कारवाईनं पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळेच भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर अवघ्या दोनच दिवसात पाकिस्ताननं शांतीचा सूर लावला आहे. आम्हाला शांतता हवी आहे. युद्ध करण्याची आमची इच्छा नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज संसदेत म्हटलं. मात्र भारतावर टीका करता करता खान यांनी दहशतवादाचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. विशेष म्हणजे पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमदचं त्यांनी समर्थन केलं. भारत सरकारकडून काश्मीरमध्ये अत्याचार सुरू आहेत. त्याचमुळे एक 20 वर्षांचा तरुण आत्मघाती हल्लेखोर झाला, असं इम्रान खान म्हणाले. आदिल अहमद डार स्वातंत्र्याची भाषा करत होता. त्यामुळेच त्यानं स्वत:ला स्फोटकांसह उडवलं, असंदेखील खान यांनी म्हटलं. आदिलचा पुरेपूर बचाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासाठी खान यांनी तमिळ टायगर्सचा संदर्भ दिला. पाकिस्तान गेल्या 20 वर्षांपासून आपल्याच जमिनीवर दहशतवादाचा सामना करत असल्याचंदेखील खान म्हणाले. भारतावर टीका करताना खान यांनी दहशतवाद्यांचं समर्थन केलं. पुलवामातील हल्ला आपल्याच स्थानिक दहशतवाद्यानं केल्याचं जैश ए मोहम्मदनं जाहीर केलं होतं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरनं डारचं कौतुकदेखील केलं होतं. यासाठी अजहरनं ऑडिओ क्लिपदेखील जारी केली होती. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. गेल्या चार वर्षांपासून काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबद्दल भारतीय जनतेनं सरकारला प्रश्न विचारायला हवेत, असं खान म्हणाले. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादी