पाकिस्तानी धर्मगुरूचे विमान लाहोरला वळवले

By Admin | Updated: June 24, 2014 09:07 IST2014-06-24T02:04:25+5:302014-06-24T09:07:46+5:30

पाकिस्तानी सरकारविरोधात क्रांतीचा एल्गार देणा:या पाकिस्तानी धर्मगुरूचे विमान सुरक्षेच्या कारणावरून लाहोरला वळविण्यात आले

Pakistani pilgrims diverted to Lahore | पाकिस्तानी धर्मगुरूचे विमान लाहोरला वळवले

पाकिस्तानी धर्मगुरूचे विमान लाहोरला वळवले

>इस्लामाबाद- लाहोर : पाकिस्तानी सरकारविरोधात  क्रांतीचा एल्गार देणा:या पाकिस्तानी धर्मगुरूचे विमान सुरक्षेच्या कारणावरून लाहोरला वळविण्यात आले असून, त्याच्या समर्थकांच्या पोलिसांशी चकमकी चालल्या आहेत. ताहिर उल काद्री असे या धर्मगुरूचे नाव असून, तो कॅनडात वास्तव्याला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान व काही मंत्री यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. 
काद्रीने लाहोरमध्ये विमानातून बाहेर पडण्यास नकार दिला व विमान परत इस्लामाबादला न्यावे, अशी मागणी केली. काद्री कॅनडातून पाकिस्तानला परतला असून, त्याने सरकारविरोधी क्रांतीची घोषणा केली आहे. पाकचे माहितीमंत्री परवेझ रशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार  काद्रीचे समर्थक इस्लामाबादच्या रस्त्यावर जमले होते, काद्रीच्या जीवाला धोका असल्याने त्याचे विमान लाहोरला वळविले. आपल्याला काही धोका झाल्यास ती सरकारची जबाबदारी असेल, असे त्याने अलीकडेच जाहीर वक्तव्य केले असल्याने  त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर आहे, असे रशिद यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांचे भाऊ शहाबाज शरीफ हे दोघे खुनी असून, आपला त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही, असे काद्रीने विमानातून केलेल्या भाषणात  म्हटले आहे. आपला फक्त लष्करावर विश्वास असून, लेफ्ट. जन वा कॉर्प्स कमांडर पदाच्या अधिका:याने आपल्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, असे त्याने म्हटले आहे. 
काद्री इस्लामाबाद येथे जाणार होता व तिथून ट्रंक रोडमार्गे लाहोरला रॅली काढण्याचा त्याचा मानस होता; पण सरकारने घाबरून रविवारी रात्री इस्लामाबाद  व रावळपिंडी विमानतळ सीलबंद केले असून सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
 
 
 

Web Title: Pakistani pilgrims diverted to Lahore