सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 10:29 AM2019-08-29T10:29:51+5:302019-08-29T10:30:31+5:30

पाकिस्तान एलओसीवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचा प्लॅन आखत आहे.

Pakistani Movement near LOC 3 brigade posted in POK planning for infiltration | सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चीनचा सहारा घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताविरोधात कट रचण्याच्या प्रयत्नात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने एलओसीवर केवळ सैनिकांचीच संख्या वाढवली नाही तर पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करत आहे. 

पाकिस्तान एलओसीवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचा प्लॅन आखत आहे. तसेच, पाकिस्तानच्या लष्काराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिकांची संख्या वाढविली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटलीमध्ये एओसीजवळ पाकिस्तानचे तीन ब्रिगेड तैनात आहेत. याशिवाय, एओसीवर पाकिस्तानच्या लष्कराने 10 ऑब्जरव्हेशन पाईंट तयार केले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील सुंदरबनी, नौशेरा आणि राजौरी सेक्टमध्येही पाकिस्तानेच सैनिक तैनात आहेत. 

सीमेवर हालचाली वाढल्या...
पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) शिवाय 100 हून अधिका पाकिस्तानी सर्व्हिस ग्रुप आणि कमांडो सुद्धा तैनात केले आहेत. असेही सांगण्यात येत आहे की, लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांची काश्मीरच्या मुद्द्यावरुन कमांडर्ससोबत बैठक सुद्धा झाली आहे. कारण, पाकिस्तानला माहीत आहे की, भारतासोबत थेट युद्ध करुन जिंकू शकणार नाही. यासाठी सैनिकांच्या आडून दहदशतवाद्यांनी भारतात घुसवण्याचा प्लॅन करण्यात येत आहे. 

300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 300 दहशतवादी ठिकठिकाणी आणले आहेत. या दहशतवाद्यांमध्ये 15 अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. जास्तकरुन दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरच्या लीपा खोऱ्यात आहेत. पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याच्या तयारीत आहे.
 

Web Title: Pakistani Movement near LOC 3 brigade posted in POK planning for infiltration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.