पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा मोहालीमध्ये जयघोष, विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी
By Admin | Updated: August 28, 2014 19:06 IST2014-08-28T19:01:03+5:302014-08-28T19:06:30+5:30
पाकिस्तानविरूध्द श्रीलंका यांच्यात सुरू असलेला क्रिकेटचा सामना टीव्हीवर पाहताना पाकिस्तानच्या बाजुने जयघोष केल्याने जयपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा मोहालीमध्ये जयघोष, विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी
ऑनलाइन टीम
चंदीगड, दि. २८ - पाकिस्तानविरूध्द श्रीलंका यांच्यात सुरू असलेला क्रिकेटचा सामना टीव्हीवर पाहताना पाकिस्तानच्या बाजुने जयघोष केल्याने जयपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये राडा झाला. या राड्यात एकूण १२ विद्यार्थी जखमी झाले असून ही घटना मोहालीमधील स्वामी परमानंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घडली.
मंगळवारी पाकिस्तान विरूध्द श्रीलंका यांच्यातील वन-डे सामना पाहण्यासाठी हॉस्टेलच्या रूममध्ये विद्यार्थी एकत्र जमले होते. यावेळी जम्मू-कश्मिरमधील असलेल्या सात आठ विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचा जयघोष करीत आनंद साजरा करायला सुरूवात केली. याला इतर विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविताच दोन गटांत बाचाबाची त्यानंतर हाणामारी झाली. या हाणामारीत एकूण बारा विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर जवळील हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सोडण्यात देण्यात आले आहे. सुदैवाने या हाणामारीत एकही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही. या घटनेनंतर ८ सप्टेंबरपर्यंत इन्स्टीट्यूट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, बुधवारी ३० विद्यार्थ्यांने एकत्र येत भाजपाच्या एका स्थानिक नेत्याला घेवून चंदीगड-अंबाला हायवे रोड तासभर रोखण्याचा प्रयत्न केला.