पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडावा - नवाजुद्दीन सिद्दीकी

By Admin | Updated: October 4, 2016 12:51 IST2016-10-04T11:53:04+5:302016-10-04T12:51:13+5:30

भारत आणि पाकिस्तानमधील सद्य परिस्थिती अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून जायला हवे, असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने म्हटले आहे.

Pakistani artists should leave India - Nawazuddin Siddiqui | पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडावा - नवाजुद्दीन सिद्दीकी

पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडावा - नवाजुद्दीन सिद्दीकी

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.4 - पाकिस्तानी कलाकारांसदर्भात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने 'भाईजान' सलमान खानविरोधी भूमिका मांडली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सद्य परिस्थिती अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून जायला हवे, असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने म्हटले आहे. 'बजरंगी भाईजान' सिनेमामधील भूमिका आणि सलमान खानप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांना समर्थन देणार का?, असा प्रश्न प्रसिद्धी माध्यमांनी विचारल्यानंतर सिद्दीकीने त्यावर, 'पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून जायला हवे', असे उत्तर दिले आहे.

आणखी बातम्या:
मी कोणत्या अभिनेत्यांच्या समुहाशी संबंधित आहे, यापेक्षा आता आपल्या देशाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, आणि देशाहून अधिक महत्त्वाचे दुसरे काही नाही, असेही नवाजुद्दीने म्हटले आहे. दरम्यान, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्यासाठी मनसेने 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता.यावेळी 'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' अशा शब्दांत अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले होते. एकूणच पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्यासंदर्भात बॉलिवूडमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 

Web Title: Pakistani artists should leave India - Nawazuddin Siddiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.