शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चीनसोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान घेईल गैरफायदा, लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 21:50 IST

नवी दिल्ली, दि. ६ - भारत आणि चीनमध्ये सुमारे दोन महिने चाललेला डोकलाम विवाद थांबून आता परिस्थिती सर्वसामान्य बनू लागली आहे. मात्र असे असले तरी लष्कराने दोन आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. उत्तरेकडील सीमेवर संघर्ष उदभवल्यास पश्चिमेकडील शत्रू देश त्याचा गैरफायदा उठवू शकतो, असे होण्याची शक्यता अधिक आहे, असा सावधगिरीचा ...

नवी दिल्ली, दि. ६ - भारत आणि चीनमध्ये सुमारे दोन महिने चाललेला डोकलाम विवाद थांबून आता परिस्थिती सर्वसामान्य बनू लागली आहे. मात्र असे असले तरी लष्कराने दोन आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. उत्तरेकडील सीमेवर संघर्ष उदभवल्यास पश्चिमेकडील शत्रू देश त्याचा गैरफायदा उठवू शकतो, असे होण्याची शक्यता अधिक आहे, असा सावधगिरीचा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. राजधानी नवी दिल्लीत आयोजित भविष्यातील युद्ध या कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी भारत हा दोन विरोधी देशांनी घेरलेला आहे, असे त्यांनी सांगितले. रावत म्हणाले, सीमेवर भारताचे दोन शत्रू आहेत. त्यातील उत्तर सीमेवरील देश म्हणजे चीन आणि पश्चिम सीमेवरील देश म्हणजे पाकिस्तान. त्यातील पश्चिम सीमेवरील शत्रूचा विचार केल्यास  आम्हाला त्याच्यासोबत कुठल्याही वाटाघाटींची शक्यता वाटत नाही. कारण भारत त्यांची फाळणी करू पाहतोय, असे तेथील राजकारणी, जनता आणि सैन्याला पढवण्यात आले आहे. त्यांनी आपल्यासोबत छद्म युद्ध पुकारलेले आहे. आता आपला देश कधीपर्यंत हे सर्व सहन करेल आणि कधी सहनशक्तीचा अंत होऊन युद्धाला तोंड फुटेल याबाबत काही सांगता येत नाही." त्याबरोबरच उत्तर सीमेवरही युद्धजन्य परिस्थितीसाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. याआधी भारतीय लष्कर अडीच आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे वक्तव्य रावत यांनी केले होते.  चीन आणि पाकिस्तानकडून असलेले बाह्य धोके आणि देशांतर्गत सुरक्षितता अबाधित राखणे अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली होती. एका वृत्तसंस्थेशी बोलताना जनरल रावत यांनी या सज्जतेस ‘अडीच आघाड्यांची सज्जता’ असे संबोधले होते. मात्र लष्कराची ही सिद्धता कोणताही ठराविक देश डोळ्यांपुढे ठेवून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.जनरल रावत म्हणाले की, एकाच वेळी अनेक आघाड्यांचा मुकाबला करण्यास भारताची तयारी असली तरी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचे (युद्धाखेरीज) इतरही परिणामकारक मार्ग उपलब्ध असतात. याच संदर्भात, गेल्या ४० वर्षांत भारत-चीन सीमेवर एकही गोळी झाडण्याची कधी वेळ आलेली नाही, या पंतप्रधानांच्या विधानाचा त्यांनी संदर्भ दिला होता..

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन