पाकिस्तान बंद करणार नाही मोठ्या रकमेच्या नोटा
By Admin | Updated: November 16, 2016 01:18 IST2016-11-16T01:18:07+5:302016-11-16T01:18:07+5:30
पाकिस्तान सरकार ५ हजारांची नोट तसेच ४0 हजार रुपयांचे रोखे रद्द करणार नाही, असे स्पष्टीकरण पाकचे अर्थमंत्री इशाक दर यांनी केले.

पाकिस्तान बंद करणार नाही मोठ्या रकमेच्या नोटा
इस्लामाबाद : पाकिस्तान सरकार ५ हजारांची नोट तसेच ४0 हजार रुपयांचे रोखे रद्द करणार नाही, असे स्पष्टीकरण पाकचे अर्थमंत्री इशाक दर यांनी केले. पाकही मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांत प्रसिद्ध झाल्याने दर यांनी हा खुलासा केला आहे.
दर यांनी दै. डॉनला सांगितले की, पाच हजारांच्या नोटा आणि ४0 हजारांचे रोखे रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्या निराधार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांचे विशेष सहायक हारुण अख्तर खान यांनी काल मोठ्या रकमेच्या नोटा आणि रोखे रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे म्हटले होते.
करसुधारणा आयोगाने २0१६-१७ च्या अर्थसंकल्पाआधी मोठ्या नोटा रद्द करण्याचा प्रस्ताव दिला होता.त्यावरील अंतिम निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. (वृत्तसंस्था)