शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिनाब आणि अंजी पुलाचे उद्घाटन करण्यासोबतच ४६ हजार कोटी रुपयांच्यां प्रकल्पांची पायाभरणी केली.

Narendra Modi in Jammu Kashmir: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आई वैष्णो देवीच्या आशीर्वादाने आज काश्मीर खोरे देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत...असे नेहमीच म्हटले जायचे. पण, आता या रेल्वे नेटवर्कमुळे हे सत्यात उतरले आहे. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत पाकिस्तानवर दंगली घडवण्याचा आरोप केला.

पाकिस्तानचा हेतू दंगली घडवणे...पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीर हा भारतमातेचा मुकुट आहे. हा मुकुट एकामागून एक सुंदर रत्नांनी जडलेला आहे. ही वेगवेगळी रत्ने जम्मू आणि काश्मीरची ताकद आहेत. येथील प्राचीन संस्कृती, येथील परंपरा, येथील आध्यात्मिक चेतना, निसर्गाचे सौंदर्य, येथील औषधी वनस्पती ही येथील रत्ने आहेत. पाकिस्तानने याच भूमितील पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत या दोन्हींवर हल्ला केला. त्यांचा हेतू भारतात दंगली घडवणे, काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबवणे होता. 

पाकिस्तानचा लज्जास्पद पराभव कायम लक्षात राहीलआपला शेजारी देश मानवतेच्या विरोधात आहे. पण, जम्मू-काश्मीरमधील तरुणांनी आता दहशतवादाला योग्य उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ६ जून आहे. योगायोगाने एक महिन्यापूर्वी याच रात्री पाकिस्तानवर कारवाई करण्यात आली होती. आता जेव्हा जेव्हा पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल, तेव्हा त्यांना त्यांचा लज्जास्पद पराभव आठवेल, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. 

चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटनपंतप्रधान मोदी या चिनाब पुलाच्या उद्घाटनाबाबत म्हणाले, आजचा कार्यक्रम भारताच्या एकतेचा आणि भारताच्या इच्छाशक्तीचा एक उत्सव आहे. आमच्या सरकारचे भाग्य आहे की, आमच्या कार्यकाळात या प्रकल्पाला गती मिळाली आणि आम्ही ते पूर्ण केले. प्रवासात अडचणी, हवामानाच्या समस्या, डोंगरावरून सतत दरडी कोसळणे...अशा विविध समस्या आल्या. हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हानात्मक होते, परंतु आमच्या सरकारने आव्हानालाच आव्हान दिले. 

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग जम्मू-काश्मीरच्या नवीन ताकदीची ओळख आहेत. चिनाब पूल असो किंवा अंजी पूल... हे जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीचे साधन बनतील. या सुरुवातीमुळे केवळ पर्यटन वाढणार नाही, तर अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांनाही फायदा होईल. जम्मू-काश्मीरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे दोन्ही प्रदेशातील व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण होतील, उद्योगाला गती मिळेल.  पंतप्रधान मोदींनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. ही काश्मीर खोरे आणि जम्मू प्रदेशातील पहिली रेल्वे सेवा आहे. यासोबतच ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांच्या पायाभरणी, उद्घाटन केले. 

मोदींच्या दौऱ्यापूर्वी संशयितांच्या घरांवर छापेपंतप्रधान मोदींच्या दौऱ्यमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस, निमलष्करी दल, सैन्य आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळांभोवती मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे परिसरात लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी खोऱ्यातील संशयितांच्या घरांवर छापे अधिक तीव्र करण्यात आले, ज्यात ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) आणि सीमेपलीकडून सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी व्यवस्थेचा आढावा घेतला होता.

सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर