पाकच्या उलट्या बोंबा!
By Admin | Updated: April 12, 2017 00:44 IST2017-04-12T00:44:09+5:302017-04-12T00:44:09+5:30
कोणताही पुरवा नसताना भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या पाकिस्तानने आता उलट्या बोंबा मारणे सुरू केले आहे. सगळ््या शेजारी

पाकच्या उलट्या बोंबा!
इस्लामाबाद : कोणताही पुरवा नसताना भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या पाकिस्तानने आता उलट्या बोंबा मारणे सुरू केले आहे. सगळ््या शेजारी देशांशी विशेषत: शेजाऱ्यांशी चांगले संबंध असावे, असे वाटत असल्याचे पवित्रा पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.
रेडिओ पाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरी केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उभय देशांतील संबधांत तणाव निर्माण झाल्यानंतर शरीफ यांनी वरील मत व्यक्त केले. खैबर पख्तुनख्वॉमधील असघर खान येथे पाकिस्तान हवाई दल संस्थेतील पदवीधरांना ते मार्गदर्शन करीत होते.
पाकिस्तानचे लष्कर कोणत्याही धोक्याला तोंड द्यायला पूर्णपणे सज्ज व सक्षम असल्याचे शरीफ म्हणाले. सशस्त्र दलांवर देशाचा पूर्ण विश्वास असून आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार या दलांना साहित्य व उपकरणांचा पूर्ण पाठिंबा देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. देशाच्या सुरक्षिततेची संकल्पना आता खूप बदलली असून तो केवळ लष्करी दलांचा विषय राहिलेला नाही, असे ते म्हणाले.
जाधव यांना फाशी दिली गेल्यास ती ठरवून केलेली हत्या समजली जाईल, असा इशारा भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून दिल्याबद्दल शरीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला.
पाकिस्तान हा शांततेवर प्रेम करणारा देश असून त्याने नेहमीच सगळ््या देशांशी विशेषत: शेजाऱ्यांशी मित्रत्वाचे संबंध राखणारे धोरण अवलंबले आहे, असेही शरीफ म्हणाले.
शिक्षेचे राजनैतिक दुष्परिणाम
- हेरगिरी केल्याच्या आरोपावरूनभारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या देहदंडाच्या शिक्षाचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी मंगळवारी ‘अभूतपूर्व’ अशा शब्दांत वर्णन केले. या शिक्षेचे राजनैतिक दुष्परिणाम असतील, असे भाकीतही त्यांनी केले.
- उजव्या विचारसरणीच्या ‘द नेशन’या इंग्रजी दैनिकाने पहिल्या पानावर ‘हेराला देहदंडाच्या शिक्षेमुळे तणाव टोकदार होणार’ असे म्हटले. राजकीय व संरक्षण विश्लेषक डॉ. हास्सन अस्कारी यांनी जाधव यांना फाशी दिली गेल्यास उभय देशांतील तणाव आणखी वाढणार असल्याचे म्हटल्याचे वृत्तात म्हटले आहे.
- ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’नेही पहिल्या पानावर दिलेल्या मोठ्या बातमीत देहदंडाच्या शिक्षेचे अभूतपूर्व असेच वर्णन केले. ‘डॉन’ दैनिकाने शिक्षा ही ‘दुर्मिळ पाऊल’ असल्याचे म्हटले. उभय देशांतील तणाव आधीच शिगेला गेलेले असताना ही शिक्षा दिली गेल्याचे डॉनने म्हटले. भारताकडून कडक प्रतिक्रिया व्यक्त होईल, असे काहींना वाटते तर इतरांना संबंधांत काहीही नाट्यमय बदल होणार नसल्याचे वाटते.