पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By Admin | Updated: July 6, 2015 23:30 IST2015-07-06T23:30:13+5:302015-07-06T23:30:13+5:30

पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा क्रम सुरूच ठेवीत रविवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला.

Pakistan violates ceasefire once again | पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू : पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा क्रम सुरूच ठेवीत रविवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला. त्याचसोबत जम्मू जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवरील सहा भारतीय सीमा चौक्यांना लक्ष्य बनवून उखळी तोफांचा मारा केला.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकच्या या कारवाईला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू जिल्ह्याच्या अर्निया सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सहा सीमा चौक्यांना निशाणा बनवून गोळीबार केला आणि उखळी तोफांमधून गोळे डागले.
पाकच्या सैनिकांनी हलक्या शस्त्रांचा वापर केला आणि ८२ एमएमचे तोफगोळे डागले. या घटनेनंतर सीमेवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली. (वृत्तसंस्था)

पाककडून गोळीबार होताच सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांनीही मोर्चा सांभाळला आणि गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. रविवारी रात्री सुरू झालेला हा दुतर्फा गोळीबार सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होता. यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan violates ceasefire once again