पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By Admin | Updated: October 6, 2014 02:34 IST2014-10-06T00:19:52+5:302014-10-06T02:34:24+5:30
पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर तुफान गोळीबार केला.

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर तुफान गोळीबार केला. या महिन्यात पाकने शस्त्रसंधी मोडण्याची ही दहावी वेळ आहे.
भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांनीही पाकच्या या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बालनोई सब सेक्टरमधील भारतीय चौक्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती संरक्षण खात्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी दिली.
या गोळीबारात कोणतीही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकने गोळीबार करण्याची गेल्या पाच दिवसांतील ही दहावी वेळ आहे. काल शनिवारी पाकी सैन्याने पूंछ जिल्ह्यात गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला होता. (वृत्तसंस्था)