शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धोका वाढला! दहशतवाद्यांनी अचानक १५ वर्षे जुना 'तो' मार्ग धरला; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 19:15 IST

काश्मीरमध्ये घुसखोरीच्या तयारीत असलेल्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराची कारवाई

नवी दिल्ली: काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांनाभारतीय जवानांनी कंठस्नान घातलं आहे. रामपूर सेक्टरमधील रुस्तम बटालियन परिसरात असलेल्या हथलंगा जंगलाजवळ जवानांनी ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलाचे जवान कायमच अशा कारवाया करत असतात. मात्र दहशतवाद्यांच्या या घुसखोरीनं सुरक्षा दलांची चिंता वाढवली आहे. रुस्तम बटालियनच्या हथलंगा परिसरात गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच घुसखोरीचा प्रकार घडला आहे.

२००५ मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तारांचं कुंपण उभारण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांच्या घुसखोरांचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. या भागात असलेल्या सुरक्षा दलाच्या चौक्यांमधून दहशतवाद्यांच्या हालचाली सहज टिपता येतात. त्यामुळे गेल्या दीड दशकात इथून घुसखोरी झाली नव्हती. मात्र आता दहशतवाद्यांनी याच मार्गानं घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच कालावधीपासून घुसखोरीसाठी वापरात नसलेल्या मार्गांवर भारतीय सुरक्षा दलांचं फारसं लक्ष नसावं, या विचारातून हथलंगामध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला असावा, असं जाणकारांना वाटतं."मिस्टर 56 चीनला घाबरतात"; काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

नव्या मार्गांचा शोध; स्थानिकांच्या बैठकाघुसखोरीसाठी जुन्या मार्गांचा वापर करता यावा म्हणून सीमेपलीकडे असलेले दहशतवादी स्थानिकांची आणि गाईड्सची मदत घेत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. पाकव्याप्त काश्मीरचे रहिवासी आणि गाईड्स यांच्या बैठका सातत्यानं घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये जुने मार्ग पुन्हा वापरण्याबद्दल आणि नवे मार्ग शोधण्यासंदर्भात चर्चा होत आहे. भारतीय लष्कराच्या नजरेस न पडता काश्मीर कसं गाठावं, याबद्दलच्या योजना बैठकीत आखल्या जात आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान