पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र,त्यांना वाळीत टाका- राजनाथ सिंग

By Admin | Updated: September 18, 2016 20:51 IST2016-09-18T20:40:51+5:302016-09-18T20:51:40+5:30

जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्याचा केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी तीव्र शब्दात निषेध

Pakistan Terrorist Nation, Put them in line - Rajnath Singh | पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र,त्यांना वाळीत टाका- राजनाथ सिंग

पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र,त्यांना वाळीत टाका- राजनाथ सिंग

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि.18- जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्याचा केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी तीव्र शब्दात निषेध केला आणि पाकिस्तानवर सडकून टीका केली. पाकिस्तानवर जोरदार हल्ला करताना पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे आणि त्यांना वाळीत टाकलं पाहिजे असं ते म्हणाले.

हल्ला करणा-या दहशतवाद्यांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. हल्ला करणा-यांना सोडलं जाणार नाही, त्यांना धडा शिकवणारच असा संकल्प सिंग यांनी  यावेळी  व्यक्त केला. या घटनेनंतर सिंग यांनी आपला रशिया आणि अमेरिकेचा दौरा रद्द केला.
 
या हल्ल्यानंतर तातडीची बैठक बोलावण्यात आली होती . जवळपास एक तास झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्यासह गृह आणि संरक्षण मंत्रालयाचे सर्व मुख्य अधिकारी उपस्थित होते. 
 

 

Web Title: Pakistan Terrorist Nation, Put them in line - Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.