पाकने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करावीत

By Admin | Updated: January 25, 2016 01:58 IST2016-01-25T01:58:16+5:302016-01-25T01:58:16+5:30

पाकिस्तान देशातील अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करू शकतो आणि ते त्यांनी करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले

Pakistan should destroy terrorists | पाकने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करावीत

पाकने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करावीत

वॉशिंग्टन : पाकिस्तान देशातील अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करू शकतो आणि ते त्यांनी करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. भारतातील वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाकिस्तान दौऱ्याचे ओबामा यांनी कौतुक केले, तर पठाणकोट हल्ला म्हणजे भारत अनेक वर्षांपासून सहन करीत असलेल्या अतिरेकी कारवायांचाच एक भाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारत-अमेरिका संबंध, वाढता दहशतवाद, पॅरिस जलवायू शिखर संमेलनाचे फायदे अशा अनेक विषयावर ओबामा यांनी आपले मत व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानचे नेते चर्चेची तयारी करीत आहेत. तथापि, दहशतवादाचा मुकाबला कसा करावा यावर विचार करीत आहेत. भारत आणि अमेरिका संबंधही निर्णायक टप्प्यावर असल्याचे सांगत ओबामा म्हणाले की, मजबूत संबंधांसाठी मोदी यांनी घेतलेला पुढाकार उत्साह दर्शविणारा आहे.
२०१४ मधील पेशावरच्या शाळेवरील हल्ल्यानंतर शरीफ यांनी अतिरेक्यांना लक्ष्य करण्याचा संकल्प केला होता, याची आठवण ओबामा यांनी करून दिली. तर या घटनेनंतर पाकिस्तानने अनेक अतिरेकी संघटनांवर कारवाई केल्याचेही ते म्हणाले.

 

Web Title: Pakistan should destroy terrorists