शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय -  पंतप्रधान नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 15:48 IST

Pulwama Terror Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

ठळक मुद्देएकाही दहशतवाद्याला सोडलं जाणार नाही- नरेंद्र मोदीहल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य - नरेंद्र मोदी

झांसी - पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला जाणार, असा इशारा पंतप्रधान मोदींनी झांसी येथील जाहीर सभेला संबोधित करताना दिला आहे. ''भारतीय लष्कराला प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी योग्य ते स्थान आणि वेळे निवडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे. पुलवामाच्या हल्लेखोरांना शिक्षा नक्कीच मिळणार. आपल्या जवानांनी देशाचे संरक्षण करताना स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावले आहे.

''कोणत्या वेळेस, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या स्वरुपात प्रत्युत्तराची कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य सैन्य दलाला देण्यात आले आहे. शेजारील देशांच्या कुटील मनसुब्यांना आपल्या देशातील 130 कोटी जनता मिळून सडेतोड उत्तर देतील'', असाही इशाराही पंतप्रधान मोदींनी दिला आहे. 

पुढे पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, आज संपूर्ण देश दुःखी झाला आहे. तुम्हा सर्वांच्या भावना मी समजू शकतो. प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट आहे की, मोठ-मोठ्या देशांनी पाकिस्तानसोबत संबंध प्रस्थापित करताना अंतर राखले आहे. पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. त्याची वाईट अवस्था करण्यात आली आहे.  

'नवीन रीति आणि नीतिचा भारत'पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणाले की, हा भारत नवीन रीति आणि नीतिचा आहे, हे कदाचित आपला शेजारील देश विसरत आहे. दहशतवादी संघटनांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी हिंसक मानसिकता दाखवली आहे, त्याचा संपूर्ण हिशेब चुकता केला जाईल. 

भारतीय लष्करावर सर्वांत मोठा हल्लादरम्यान, पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी)जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

तालिबानी स्टाईलचा हल्लावाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे. असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली. 192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

काय होता गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट?या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट राहावे.

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान