काश्मिरसाठी वाट्टेल ती किंमत मोजायला पाकिस्तान तयार - जनरल राहील शरीफ
By Admin | Updated: June 13, 2015 17:51 IST2015-06-13T17:51:58+5:302015-06-13T17:51:58+5:30
शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेवर भारत अस्थिरता निर्माण करत असल्याचा उलटा आरोप पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी केला असून पाकिस्तानच्या

काश्मिरसाठी वाट्टेल ती किंमत मोजायला पाकिस्तान तयार - जनरल राहील शरीफ
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेवर भारत अस्थिरता निर्माण करत असल्याचा उलटा आरोप पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी केला असून पाकिस्तानच्या विविध प्रांतात दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच काश्मिरसाठी पाकिस्तान वाट्टेल ती किंमत मोजेल असा इशाराही शरीफ यांनी दिला आहे.
आम्हाला असलेला दहशतवादाचा त्रास जगजाहीर असल्याचं सांगताना शस्त्रसंधीचं उल्लंघन, आदिवासी भाग, बलुचिस्तान व कराचीमध्ये होत असलेला दहशतवाद पाकिस्तानविरोधी शक्ती करत असल्याचं शरीफ यांनी भारताचं नाव न घेता सांगितले.
पाकिस्तानने अन्य देशांशी शांती राखण्यासाठी सहकार्य केल्याचंही शरीफ यांनी म्हटलं आहे, अर्थात पाकिस्तानचं सार्वभौमत्व आणि राष्ट्राभिमान सगळ्यात अहम असल्याचं त्यांनी सांगितले. काश्मिरसह देशाच्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी आम्ही कुठलीही किंमत मोजायला तयार आहोत असा सूचक इशाराही शरीफ यांनी दिला आहे.