पठाणकोट हल्ला प्रकरणी अखेर पाकिस्तान पोलिसांनी केला गुन्हा दाखल
By Admin | Updated: February 19, 2016 17:05 IST2016-02-19T13:10:09+5:302016-02-19T17:05:19+5:30
पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी अखेर पाकिस्तानने कारवाईच्या दिशेने पहिले पाऊल उचलले असून; पाकिस्तान पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

पठाणकोट हल्ला प्रकरणी अखेर पाकिस्तान पोलिसांनी केला गुन्हा दाखल
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 19 - पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी अखेर पाकिस्तानने कारवाईच्या दिशेने पहिले पाऊल उचलले असून; पाकिस्तान पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पोलिसांनी हा एफआयआऱ दाखल केला आहे. यामध्ये कोणाचंही नाव घेण्यात आले नसून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पुरवलेल्या फोन नंबरचीदेखील या तक्रारीत नोंद करण्यात आली आहे.
2 जानेवारीला पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यामध्ये 7 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्यानंतर भारताने या हल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला गेल्याचे पुरावे दिले होते. तसंच या हल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याचा हात असल्याचेही ठोस पुरावे देत कारवाई करण्याची मागणी भारताने वारंवार केली होती.