‘पाकिस्तानला उघडे पाडा’

By Admin | Updated: August 7, 2015 22:15 IST2015-08-07T22:15:04+5:302015-08-07T22:15:04+5:30

गुरदासपूर आणि उधमपूर येथील ताज्या अतिरेकी हल्ल्याचे शुक्रवारी लोकसभेत जोरदार पडसाद उमटले. सीमेपलीकडून होणाऱ्या या

'Pakistan open fire' | ‘पाकिस्तानला उघडे पाडा’

‘पाकिस्तानला उघडे पाडा’

नवी दिल्ली : गुरदासपूर आणि उधमपूर येथील ताज्या अतिरेकी हल्ल्याचे शुक्रवारी लोकसभेत जोरदार पडसाद उमटले. सीमेपलीकडून होणाऱ्या या कारवायांविरूद्ध कठोर पावले उचला आणि पाकिस्तानचे कटकारस्थान जगासमोर आणण्यासाठी मोहीम चालवा, अशी मागणी यानिमित्ताने केली गेली.
शिवसेनेचे विनायक राऊत यांनी शून्य प्रहरात उधमपूर हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. जिवंत पकडण्यात आलेल्या अतिरेक्यांविरुद्ध खटला चालवण्यासाठी जलद गती न्यायालये गठित व्हावी. जेणेकरून त्यांना लवकर शिक्षा मिळेल आणि त्यामुळे इतरांना जरब बसेल, असे राऊत म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'Pakistan open fire'