पाकचे आता सायबर अटॅक, आयटी कंपन्यांना लक्ष्य
By Admin | Updated: October 15, 2016 01:59 IST2016-10-15T01:59:28+5:302016-10-15T01:59:28+5:30
: भारताने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकिस्तानी हॅकर्सनी भारतातील आयटी कंपन्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली

पाकचे आता सायबर अटॅक, आयटी कंपन्यांना लक्ष्य
हैदराबाद : भारताने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकिस्तानी हॅकर्सनी भारतातील आयटी कंपन्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत हैदराबादमधील सुमारे आयटी कंपन्यांना या हॅकर्सनी टार्गेट केले आहे. या सायबर हल्ल्यात ह्यसोसायटी फॉर सायबराबाद सिक्युरिटी कौन्सिलह्ण (एससीएससी) सह शहरातील काही मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
साइट्सवरून कोणी तरी माहिती चोरण्याचा प्रयत्न असल्याचे निर्दशनास आल्यानंतर सोसायटी
फॉर सायबराबाद सिक्युरिटीने पोलिसांच्या सायबर सेलकडे त्याची तक्रार केली आहे. भारतीय आयटी कंपन्यांवर सायबर अटॅक करण्यासाठी पाकिस्तानी हॅकर्स पाकिस्तानी हॅकर्स तुर्की, सोमालिया व सौदी अरेबियातील सर्व्हर वापरत आहेत, अशी माहिती सायबर सुरक्षा फोरमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.या या सायबर अटॅकनंतर काही समस्या सोडवण्यात आल्या असून, काही कंपन्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये येथे झालेले सायबर अटॅक हे पाकिस्तानातून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. काही कंपन्यांनी याबाबत तक्रार नोंदवत आयटी कॉरिडोरच्या सुरक्षेची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)