शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कर्तारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनासाठी पाककडून नवज्योत सिंग सिद्धूंना आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 20:17 IST

कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला खुला करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यासाठी पंजाबचे माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण पाठवले आहे. दरम्यान, या वृत्ताला नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आमंत्रण पाठवले होते. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले नाही. मात्र, त्यावेळी मनमोहन सिंग यांनी म्हटले होते की, विशेष अतिथी म्हणून नव्हे, तर सामान्य व्यक्ती म्हणून या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पार्टीच्यावतीने नवज्योत सिंग सिद्धू यांना कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानचे खासदार फैसल जावेद यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानुसार नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी टेलिफोनवरून बातचीत केली असून 9 नोव्हेंबरला या सोहळ्यात उपस्थित होण्याचे आमंत्रण दिले आहे. 

दरम्यान, भारतातील शीख धर्मीयांसाठी महत्त्वाचा असलेला कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला खुला करण्यात येणार आहे. या विशेष कॉरिडोरने कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाबा नानक गुरुद्वाराला जोडले जाणार आहेत. त्याद्वारे भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानातील कर्तारपूरला जाता येणार आहे. त्यासाठी केवळ एक परमिट घ्यावे लागणार आहे. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराची स्थापना शिखांचे धर्मगुरू गुरूनानक देव यांनी 1522मध्ये केली होती. शीख धर्मीयांचे हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे.  

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPakistanपाकिस्तान