शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान आजही दहशतवाद्यांसाठी स्वर्गच- अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 11:21 IST

दहशतवादी संघटनांवर कारवाई होत असल्यानं अमेरिकेनं व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली: पाकिस्तानदहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित देश असल्याचं अमेरिकन सरकारनं आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. अमेरिकेच्या सरकारनं 'कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम 2017' या नावानं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे दहशतवाद्यांना आसरा देणारा पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा जगसमोर आला आहे. पाकिस्तान सरकारकडून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांवर योग्य कारवाई केला जात नाही. त्यामुळेच या संघटना भारतात हल्ले करतात, अशा शब्दांमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणावर भाष्य केलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदचा उल्लेख या अहवालात आहे. 'हाफिज सईदला जानेवारी 2017 मध्ये ताब्यात घेण्यात आलं. यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये त्याची सुटका झाली. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या संघटना अगदी उघडपणे लोकांकडून निधी गोळा करतात, तरुणांची भरती करतात, त्यांना दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देतात. मात्र पाकिस्तान सरकारनं याला कोणताही लगाम घातलेला नाही', असं अमेरिकेनं अहवालात म्हटलं आहे. पाकिस्तान सरकार दहशतवादाला रोखण्यासाठी कठोर पावलं उचलताना दिसत नाही. त्यामुळेच दहशतवादी संघटनांकडून सर्रास हिंसक कारवाया केल्या जातात. या कारवायांचा फटका भारतासह पाकिस्तानलाही अनेकदा बसला आहे. आत्मघाती हल्ले, दिवसाढवळ्या केल्या जाणाऱ्या हत्या, शाळा, बाजार, सरकारी कार्यालयांवर होणारे ग्रेनेड हल्ले यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तान सरकारनं कठोर भूमिका न घेतल्यानं दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाल्याचं अमेरिकन सरकारच्या अहवालातून अधोरेखित झालं आहे.  

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाJaish e Mohammadजैश ए मोहम्मदUSअमेरिकाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी