सोशल मिडीयावर पाकिस्तानला खिल्लीचा 'यॉर्कर'

By Admin | Updated: October 4, 2016 18:23 IST2016-10-04T17:45:58+5:302016-10-04T18:23:01+5:30

भारत-न्यूझीलंड सामन्यात हारला न्यूझीलंड पण ख-या अर्थाने पाकिस्तानचाच पराभव झाला अशा आशयाच्या मेसेजने पाकिस्तानची खिल्ली

Pakistan gets 'yorker' on social media | सोशल मिडीयावर पाकिस्तानला खिल्लीचा 'यॉर्कर'

सोशल मिडीयावर पाकिस्तानला खिल्लीचा 'यॉर्कर'

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 4 - भारत-न्यूझीलंडदरम्यान झालेल्या कोलकाता कसोटीत भारताने 178 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडचा पराभव झाला. मात्र या सामन्यानंतर सोशल मिडीयावर ख-या अर्थाने पाकिस्तानच हारला अशा आशयाचे मेसेज पोस्ट होत आहेत. न्यूझीलंडला नमवत भारताने कसोटी क्रमवारीत पाकिस्तानकडून पहिलं स्थान हिसकावून घेतलं. त्यानंतर सोशल मिडीयावर पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवण्यात येत आहे.
 
एक नजर सोशल मिडीयावर प्रतिक्रियांवर 
 
 
भारताने पाकिस्तानकडून अव्वल स्थान हिसकावल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याची तयारी चालवली आहे. आता आणखी 100 दहशतवाद्यांना त्यांनी प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली.
 
पाकिस्तान भारताला म्हणालं, तुम्ही कसोटी क्रमवारीत आमच्या पुढे गेलात पण दहशतवादामध्ये आम्हीच अव्ल स्थानी कायम राहणार  
भारतामुळे पाकिस्तानची क्रमवारी घसरली आता कोहलीच्या घरी धमकी देणारा फुगा भेटला तर आश्चर्य वाटणार नाही.
 
 
 
 
 
 
 
 पाकिस्तानची तर कसोटी क्रमवारीपण चायनिज निघाली

 

Web Title: Pakistan gets 'yorker' on social media