पाकिस्तानचा पुन्हा भारतीय चौक्यांवर गोळीबार

By Admin | Updated: April 4, 2017 15:16 IST2017-04-04T15:16:49+5:302017-04-04T15:16:49+5:30

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे.

Pakistan firing again in Indian posts | पाकिस्तानचा पुन्हा भारतीय चौक्यांवर गोळीबार

पाकिस्तानचा पुन्हा भारतीय चौक्यांवर गोळीबार

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 4 - जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे. राजौरीच्या भीमभेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि मॉटर्र शेलचा मारा केला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. अजूनही हा गोळीबार सुरु आहे. 
 
गोळीबारात भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. राजौरी-पूँछ जिल्ह्यात 24 तासात पाकिस्तानने तिस-यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. कालही पाकिस्तानी सैन्याने बालाकोटे सेक्टरमध्ये गोळीबार आणि मोटर्र  शेल्सचा मारा केला होता. 
दीगवार भागात मोठया प्रमाणात झालेल्या मॉटर्र शेल्सच्या मा-यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 
याच भागात 1 एप्रिलला आईडीच्या स्फोटात एका जेसीओचा मृत्यू झाला होता. मार्च महिन्यात पूँछमध्ये पाकिस्तानने चारवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. 2016 मध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ 228 वेळा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ 221 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. 
 

Web Title: Pakistan firing again in Indian posts