पाकिस्तानमध्ये ६ अतिरेक्यांचा खात्मा

By Admin | Updated: October 18, 2016 05:02 IST2016-10-18T05:02:43+5:302016-10-18T05:02:43+5:30

पंजाब प्रांतात उडालेल्या चकमकीत तालिबानच्या सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला.

Pakistan extends to 6 terrorists | पाकिस्तानमध्ये ६ अतिरेक्यांचा खात्मा

पाकिस्तानमध्ये ६ अतिरेक्यांचा खात्मा


इस्लामाबाद : पंजाब प्रांतात उडालेल्या चकमकीत तालिबानच्या सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यात दिवंगत राज्यपाल सलमान तासीर यांच्या पुत्राचे अपहरण करणाऱ्याचा समावेश आहे.
अतिरेक्यांनी सुरक्षा दलांची चाहूल लागताच कार व दुचाकीद्वारे पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी अतिरेक्यांनी गोळीबार केला असता सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. नंतर अतिरेक्यांचे मृतदेह सापडले. घटनास्थळाहून तीन रायफल्स, तीन पिस्तुल, दोन किलो स्फोटके, गोळ्या इतर हत्यारे जप्त केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan extends to 6 terrorists