शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

डबघाईला आलेल्या पाकिस्तानला नडतोय काश्मीरचा हव्यास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 10:52 IST

पृथ्वीवरील स्वर्ग समजले जाणाऱ्या काश्मीरवर सुरुवातीपासूनच पाकिस्तानची वाकडी नजर आहे. पण काश्मीरच्या हव्यासामुळे पाकिस्तानचे...

नवी दिल्ली - पृथ्वीवरील स्वर्ग समजले जाणाऱ्या काश्मीरवर सुरुवातीपासूनच पाकिस्तानची वाकडी नजर आहे. पण काश्मीरच्या हव्यासामुळे पाकिस्तानचे चौफेर नुकसान होत असल्याचे मत पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाची सखोर माहिती असलेल्या भारताच्या गुप्तवार्ता विभागातील एका माजी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. काश्मीरबाबत पाकिस्तानच्या मनात असलेल्या हावेमुळेच पाकिस्तानमध्ये लष्कर सर्वोच्च शक्तीकेंद्र बनली आहे. तसेच काश्मीरच्या हव्यासातूनच पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा उदय झाला असून, तेथील लोकशाही धोक्यात आली आहे, असे मत या अधिकाऱ्याने मांडले आहे. भारताची गुप्तहेर संघटना असलेल्या रॉ मध्ये विशेष सचिव म्हणून काम पाहिलेल्या ज्योती के. सिन्हा यांनी इंडियन डिफेन्स रिव्ह्यूमध्ये आपले मत मांडले आहे. " मोहम्मद अली जिन्ना यांचा झालेला आकस्मिक मृत्यू आणि पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये अराजकाची सुरुवात झाली. जिन्ना आणि खान यांनी पाकिस्तानला लोकशाहीची दिशा दिली होती. मात्र लवकरच लष्कर पाकिस्तानमध्ये प्रबळ झाले. तसेच काश्मीर प्रश्न हा पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा बनला. काश्मीरबाबतच्या कारवायांमुळेच पाकिस्तानात लष्कर प्रभावी आणि शक्तिशाली बनले. पुढे पाकिस्तान हा  देशाकडे लष्कर नव्हे तर लष्कराकडे असलेला देश बनला."    पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी आणि पूर्व पाकिस्तानातील बंगाली यांच्या वादातून बांगलादेशचा जन्म झाला. आज बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा कैकपटीने पुढे गेला आहे. बांगालदेशमध्ये लोकशाही स्थिरस्थावर झाली आहे. तसेच तेथील लष्करही लोकनियुक्त सरकारच्या आदेशाबरहुकूम काम करते. मात्र पाकिस्तानचे भवितव्य अनिश्चित आहे. फाळणीनंतर काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचे पाकिस्तानचे मनसुबे पूर्ण होऊ शकलेले नाही. काहीही करून काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्यामुळे भूतकाळातील घटनांमधून पाकिस्तानने धडा न घेतल्यास पाकिस्तानचे पुन्हा एकदा विभाजन अटळ आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत