शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेपूट वाकडंच... काश्मीरची बदनामी करणाऱ्या 'त्या' रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 17:00 IST

जम्मू-काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या एका अहवालावरून बराच वाद झाला होता. परंतु आता या अहवालाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या एका अहवालावरून बराच वाद झाला होता. परंतु आता या अहवालाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडातील एक पाकिस्तानी व्यक्ती जफर बंगाश यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंगाश म्हणाले, ज्या व्यक्तीनं जम्मू-काश्मीरसंदर्भात अहवाल तयार केला तो पाकिस्तानच्या संपर्कात होता. त्यामुळे या अहवालाच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याची चर्चा आहे.एएनआयच्या वृत्तानुसार, टोरँटोमध्ये असलेले जफर बंगाश हे पेशानं पत्रकार आहे आणि एका मशिदीत इमामही आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकारांचे उच्चायुक्त जायद बिन राड अल हुसेन अहवाल तयार करत असताना माझ्या संपर्कात होते. हा रिपोर्ट बनवण्यात आला त्यावेळी काश्मीरमधली काही माणसेही तिथे उपस्थित होती. त्यावेळी माझा पाकिस्तानमधल्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क झाला होता. तसेच संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकारांचे उच्चायुक्त आणि त्यांचे प्रतिनिधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते, तेव्हा त्यांचा सन्मान झाला. त्याचदरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती सरदार मसूद खानही उपस्थित होते. सरदार मसूद खान म्हणाले होते की, भारत-पाकिस्ताननं युद्धापासून बचाव केला पाहिजे, असंही जफर बंगाश यांनी सांगितलं आहे. काय होतं संयुक्त राष्ट्राच्या अहवालात ?संयुक्त राष्ट्रानं मानवाधिकार आयोगाचा अहवाल देत पाकिस्तानमध्येही दहशतवादविरोधी कायद्याच्या माध्यमातून सामान्यांना त्रास दिला जात असल्याचं अधोरेखित केलं होतं. काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनावर योग्य तोडगा काढण्यावरही अहवालात जोर दिला होता. या अहवालात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वाणीला भारतीय सुरक्षा जवानांनी ठार केल्याचाही उल्लेख केला होता,  ज्याला घाटीतून खूप विरोध झाला, असंही अहवालात म्हटलं होतं. तसेच काश्मीरमध्ये नागरिकांचं अपहरण, हत्या आणि हिसेंसारख्या प्रकारांच्या माध्यमातून मानवाधिकारांचं उल्लंघन सुरू असल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं होतं.  या अहवालावर भारतीय अधिका-यांनी आक्षेप नोंदवला होता. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरची कोणत्याही प्रकारे तुलना होऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाहीवर निवडून आलेलं सरकार आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणालाही मनमानी पद्धतीनं नियुक्त केलं जातं. अहवालात पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख आहे. संयुक्त राष्ट्रानं कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ