शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:57 IST

गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ देत पाकिस्तानचा दावा

कराची: भारत पुन्हा एकदा हल्ला करेल, अशी भीती पाकिस्तानला सतावते आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी हल्ल्याची भीती बोलून दाखवली. 16 ते 20 एप्रिल दरम्यान भारताकडून हल्ला केला जाईल, असा दावा कुरेशी यांनी केला. यावेळी त्यांनी गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ दिला. भारतानं पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक केला. तसाच हल्ला पुन्हा केला जाईल, अशी भीती कुरेशी यांनी व्यक्त केली. भारताकडून आणखी एका हल्ल्याची तयारी केली जात असल्याची विश्वसनीय माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे, असं कुरेशी यांनी पत्रकारांना सांगितलं. 16 ते 20 एप्रिल दरम्यान भारत पुन्हा एकदा हल्ला करेल, असंही ते पुढे म्हणाले. याबद्दलची अधिक माहिती पंतप्रधान इम्रान खान देशाला देण्यास तयार आहेत, असं कुरेशी यांनी सांगितलं. आम्ही याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला मेल केला. मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही, असं ते म्हणाले. भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला धडाकेबाज कारवाई करत बालाकोटवर बॉम्ब टाकले. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्याचा मोठा धसका पाकिस्ताननं घेतला. हल्ल्याला जवळपास दीड महिना उलटूनही पाकिस्ताननं हवाई मार्ग पूर्णपणे खुला केलेला नाही. एअर स्ट्राइकनंतर पाकिस्ताननं तातडीनं हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. अद्यापही पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील वाहतूक पूर्णपणे सुरू झालेली नाही. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्ताननं पाश्चिमात्य देशांकडे जाणारा एक हवाई मार्ग सुरू केला. मात्र अजूनही पाकिस्ताननं दहा मार्ग बंदच ठेवले आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकImran Khanइम्रान खानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला