शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

Defence Ministry: चीन-पाकवर भारताची बारीक नजर; संरक्षण मंत्रालयाकडून 4000 कोटींच्या 'सॅटेलाइट' प्रस्तावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 11:23 IST

Defence Ministry: संरक्षण मंत्रालयाकडून सशस्त्र दलांसाठी 8,357 कोटी रुपयांच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: भारताचे शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि चीनच्या (China-Pakistan Border) हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने (Defence Ministry) मंगळवारी 4000 कोटी रुपयांच्या सर्व्हिलांस सॅटेलाइट(surveillance satellite)ला मंजुरी दिली. या उपग्रहाद्वारे भारतीय लष्कराला सीमेवर पाळत ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 

इस्रोच्या मदतीने तयार होणार सॅटेलाइटसरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या(Defence Acquisition Council)  बैठकीत भारतीय लष्करासाठी भारत समर्पित उपग्रहाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. GSAT 7B असे या सॅटेलाइटचे नाव असून, या उपग्रहासाठीचा प्रकल्प भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या मदतीने पूर्ण केला जाणार आहे. या सॅटेलाइटद्वारे लष्कराला सीमावर्ती भागात पाळत वाढवण्यास मदत मिळेल.

सध्या ड्रोनद्वारे सीमेवर पाळत ठेवली जातेभारतीय नौदल आणि हवाई दलाकडे आधीपासून त्यांचे स्वतःचे उपग्रह आहेत. एप्रिल-मे 2020 पासून भारताचे चीनसोबतचे संबंध खराब झाले आहेत. तेव्हापासून भारतीय लष्कर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) ड्रोनद्वारे पाळत ठेवत आहे. पण, आता या सॅटेलाइटमुळे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर पाळत ठेवण्यासाठी अजून जास्त मदत मिळेल. 

380.43 कोटी रुपयांच्या 14 वस्तूंच्या खरेदीला मान्यतासंरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक झाली. या बैठकीत देशाच्या सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी 8,357 कोटी रुपयांच्या 'बाय इंडिया' श्रेणीतील सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, संरक्षण परिषदेने आज इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) स्टार्टअप्स/MSMEs कडून 380.43 कोटी रुपयांच्या 14 वस्तूंच्या खरेदीलाही मंजुरी दिली.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन