Pakistan Ceasefire Violation, BSF Mohammad Imtiaz martyred: भारत आणि पाकिस्तान यांच्यात तब्बल ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता थांबले होते. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती, पण अवघ्या ४ तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या सीमेलगतच्या भागात पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले. याचदरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसफचे एक जवान शहीद तर सात जण जखमी झाले.
शनिवारी संध्याकाळी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. पण रात्र झाल्यानंतर पाकिस्तानकडून त्याचे उल्लंघन करण्यात आले आणि कारवाया पुन्हा एकदा तीव्र झाल्या. शनिवारी रात्री पाकिस्तानने अनेक भागात युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि जोरदार गोळीबार केला, तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात संशयित ड्रोनचा स्फोट झाला. एक बीएसएफ जवान शहीद झाला आणि सात जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त पीटीआयने दिले. ही घटना आरएसपुरा सेक्टरमध्ये घडली, असे त्यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांनी वीरमरण आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफखाना डागला आहे. त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला झाला आहे. जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आहे. ही माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, आज दुपारी ३.३५ वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी ५ वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. १२ मे रोजी दोन्ही देशांचे अधिकारी पुढील रणनीतीवर चर्चा करतील, असे मिस्री म्हणाले. पण आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गोळीबार सुरु आहे आणि सायरन वाजवले जात आहेत.