सीमावर्ती गावांवर पाककडून हल्ले
By Admin | Updated: October 5, 2014 01:42 IST2014-10-05T01:42:13+5:302014-10-05T01:42:13+5:30
पूंछमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर असलेल्या गावांना लक्ष्य बनवीत पाकने शुक्रवारी रात्रभर बॉम्बसह लहान व स्वयंचलित शस्त्रंनी हल्ले चढविले. या हल्ल्यात दोन व्यक्ती जखमी झाल्या.

सीमावर्ती गावांवर पाककडून हल्ले
>जम्मू : पूंछमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर असलेल्या गावांना लक्ष्य बनवीत पाकने शुक्रवारी रात्रभर बॉम्बसह लहान व स्वयंचलित शस्त्रंनी हल्ले चढविले. या हल्ल्यात दोन व्यक्ती जखमी झाल्या. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरच्या उत्तर भागात गुलमर्ग सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधी उल्लंघनाच्या काही घटना समोर आल्या आहेत, तर जम्मू भागातील आर. एस. पुरामधील चार चौक्या, चन्ना, काको दा कोठे, कोडवाल व देवीगड या गावांवर रात्रभर हल्ले केले. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत (वृत्तसंस्था)