पाकची पुन्हा आगळीक, भारतीय सैन्यावर गोळीबार

By Admin | Updated: July 20, 2014 12:12 IST2014-07-20T12:12:12+5:302014-07-20T12:12:20+5:30

पाकिस्तानने शनिवार रात्रीपासून पुन्हा एकदा भारतीय चौक्यांवर गोळीबार करुन शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनीही पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Pakistan again firing, firing Indian army | पाकची पुन्हा आगळीक, भारतीय सैन्यावर गोळीबार

पाकची पुन्हा आगळीक, भारतीय सैन्यावर गोळीबार

 ऑनलाइन टीम

जम्मू, दि. २० - पाकिस्तानने शनिवार रात्रीपासून पुन्हा एकदा भारतीय चौक्यांवर गोळीबार करुन शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनीही पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

जम्मूतील अरनिया सेक्टर येथील सीमा रेषेजवळ भारताच्या १२ चौक्यांवर पाकिस्तान सैन्याने शनिवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून गोळीबार सुरु केला. पाक सैन्याच्या या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.  रविवारी पहाटेपर्यंत हा गोळीबार सुरु होता. यानंतरही काही अंतराने पाक सैन्याकडून गोळीबार सुरुच आहे. निवडणुकीपूर्वी पाकविरोधात मनमोहन सिंह सरकार संयमी भूमिका घेत असल्याचे आरोप करणारे नरेंद्र मोदी आता यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा रेषेवर पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. तीन दिवसांपूर्वी पाकने केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला होता. 

Web Title: Pakistan again firing, firing Indian army